एमआयएमच्या बुलडाणा तालुकाध्यक्ष पदी कमर शेख
बुलडाणा – 4 ऑक्टोबर
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून आपला पक्ष संघटन वाढवित आहे. हैदराबादहून निघालेल्या एआयएमआयएम पक्षाने राज्यात एंट्री घेतली असून बुलडाणा येथील विश्राम भवनात आयोजित पक्ष बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हाध्यक्ष शोएब अली खान यांनी नियुक्ती पत्र देऊन धाड येथील कमर शेख यांची बुलडाणा तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे. बुलडाणा तालुक्यात पक्षाला बळकटी देऊन शोषित,पीडित व अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची पक्षाच्या या भूमिकेवर आपण काम करणार,असं मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष कमर शेख यांनी व्यक्त केला आहे.या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

