राजूर घाटात ट्रकने 3-4 युवकांना चिरडले,,, चालकाला बेदम मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल,बुलडाणा जिल्ह्यातील घटना
बुलडाणा – 28 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा ते मलकापूर मार्गावरील राजूर घाटात ट्रकने 3-4 तरुणांना चिरडले,,अशी अफवा पसरली आणि ट्रकला वाघजाळ फाट्यावर अडवून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. काही सुज्ञ नागरिकांनी त्या चालकाला वाचवले,नाही तर त्याचं जीवच गेलं असतं.

बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात ट्रकने एका दुचाकीला धडक दिली होती सुदैवाने दुचाकी चालकाला ईजा झाली नाही आणि ट्रक चालक घटनास्थळी ना थांबता पळून गेला.राजूर घाटात देखील ट्रक एका कारला घासून गेल्याची माहिती बुलडाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिली.वाघजाळ फाट्यवर ट्रक थांबवून कोणतीही शहनिशा ना करता चालकाला जमावाने अमानुषपणे मारहाण केली,ट्रकची काचं देखील फोडण्यात आली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत बोरखेडी ठाण्यात नेले आणि त्याचा मेडिकल करण्यात आला. नंतर चालकाला बुलडाणा शहर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.ट्रक चालक विनय रामरत्न परमार रा.मंदसौर (मध्यप्रदेश) याला वाघजाळ फाट्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. ट्रकने राजुर घाटात 3-4 तरुणांना चिरडल्याची निव्वळ अफवाच होती.

