डबल मर्डरने हादरला बुलडाणा जिल्हा,,, मुलानेच केली आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या

More articles

डबल मर्डरने हादरला बुलडाणा जिल्हा,,,
मुलानेच केली आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या,

बुलडाणा – 27 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसा अगोदरची खामगाव येथे डबल मर्डरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशाच एका घटनेने बुलडाणा जिल्हा हादरला आहे.जन्मदात्या आई-वडिलांना मुलाने मारहाण करून ठार केल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
           या बाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस ठाणे हद्दीत ग्राम किन्ही सवडद येथील आरोपी गणेश महादेव चोपडे वय 31 वर्ष याने आपले वडील महादेव त्र्यंबक चोपडे व आई कलावतीबाई महादेव चोपडे यांना लाकडीने जबर मारहाण करून त्यांचं खून केलं आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोन्ही मृत्यू देहांचा पंचनामा करून पोस्टमार्टम साठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना बुलडाणा - 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा...
spot_img
error: Content is protected !!