“जिम कॉर्बेट” नेशनल पार्कचा “पट्टेदार वाघ” पोहोचला मलकापूर जवळच्या बोदवड मार्गावर??व्हायरल होत असलेल्या फोटोची काय आहे सत्यता??बातमी वाचल्यावरच कळेल
बुलडाणा – 16 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क
कोणतीही बातमी प्रकाशित करण्या अगोदर त्याची सत्यता पळताळणे आपलं कर्तव्य आहे,परंतु तसे होत आहे का??असा प्रश्न व्हायरल होत असलेल्या एका पट्टेदार वाघाच्या फोटोमुळे उपस्थित झालं आहे. सोशल मीडियाच्या या काळात काही ही होऊ शकते,,आता बघा उत्तराखंड राज्यातील “जिम कॉर्बेट” नॅशनल पार्क मधील वाघाला मलकापूर जवळच्या बोदवड मार्गावर दाखवण्यात आले आहे,तसे बातम्याही प्रकाशित होत आहे,,परंतु बुलडाणा जिल्ह्यात पट्टेदार वाघ नसल्याचं खुलासा बुलडाणा वनविभागाने केलं आहे.
मलकापूर शहराला लागून असलेल्या बोदवड मार्गावरील वन विभागाच्या गार्डनजवळ रात्रीच्या अंधारात एका वाहना समोरून वाघ गेला,आणि याच वाहनातून त्याचं फोटो काढण्यात आला,अश्या बातम्या जिल्ह्यात झळकत आहे.तात्काळ मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाने खबरदारी घेतली आणि काल रात्री वनपाल ए.एन. सपकाळ,वनरक्षक आर.बी.शिरसाट व वनमजुर अनिल रुपणारायन हे घटनस्थळी पोहोचले व परिसर पिंजून काढलं पण वाघाचे ठसे कुठेच दिसून आले नाही. मग तंत्रज्ञाणांचा आधार घेतला असता व्हायरल होत असलेल्या फोटोची हकीकत समोर आली. व्हायरल होत असलेला फोटो एका व्हीडिओचा स्क्रीन शॉट काढून व्हायरल करण्यात आलं आहे.वाघाचं तो व्हीडिओ उत्तराखंड राज्यातील “जिम कॉर्बेट” नॅशनल पार्कचा आहे.बुलडाणा जिल्ह्यात प्रादेशिक वनविभागाच्या वन क्षेत्रात पट्टेदार वाघ नसून बिबट आहे,असं खुलासा देखील वन विभागाने केलं.
सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना
बुलडाणा - 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा...