खडकपूर्णाचे 19 तर पेनटाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा – 16 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात काल पासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहत आहे. देऊळगांव राजा तालुक्यात वाहणारी खडकपूर्णा नदीवरील जिल्ह्यातील सर्वात मोठे संत चोखा सागर अर्थात खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात 46 हजार 854 घन फूट प्रति सेकंद पाण्याचं विसर्ग सुरू आहे. तर मेहकर तालुक्यात पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे 20 सेंटिमीटरने आज 16 सप्टेंबरला सकाळी उघडण्यात आले आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त केला जाऊ शकतो, या दोन्ही नद्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

