Breaking!!!बुलडाणा जिल्ह्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर 5 पोलीस निरीक्षक होणार जिल्ह्यात रुजू

More articles

बुलडाणा जिल्ह्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर 5 पोलीस निरीक्षक होणार जिल्ह्यात रुजू

बुलडाणा – 27 मे, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा एसपी पदावरून अगोदरच “संगीत-खुर्ची” सुरू असताना आता राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा बार फुटला आहे.जिल्ह्यात कार्यरत 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतर जिल्ह्यात झाले तर 5 पोलीस निरीक्षक जिल्ह्यात रुजू होणार आहे.
          महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केले आहे.यात कालावधी पूर्ण केलेले अधिकारी तसेच कालावधी पूर्ण ना केलेले अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आले आहे.यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एकूण सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले असून इतर जिल्ह्यातून पाच नवीन पोलीस निरीक्षक बुलडाणा जिल्ह्यात रुजू होणार आहे.अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना डॉ.सुखविंदर सिंह यांच्या स्वाक्षरीने आज 27 मे रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातून बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ब्रह्मदेव सखाराम शेळके यांची जळगाव खान्देशला, माधवराव रावसाहेब गरुड यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागात, सारंगधर वासुदेव नवलकर यांची नंदुरबार, विलास रमेश पाटील यांची वर्धा,विजयकुमार अधिकराव चव्हाण यांची मुंबई शहर,संतोष मनोहरराव महल्ले यांची हिंगोली तसेच नरेंद्र गजाननराव ठाकरे यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे.इतर ठिकाणाहून बुलडाणा जिल्ह्यात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सतीश दत्ताराम महल्ले,किशोर गोरख तावडे,आशिष सुरेश इंगळे,पंडित चिंधा सोनवणे तसेच ब्रह्म संताराम गिरी यांचा समावेश आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!