अपघातग्रस्त ट्रकची कॅबिन बोराखेडीत तर बॉडी बुलडाणा शहर ठाणेच्या हद्दीत,राजूर घाटात चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी

More articles

अपघातग्रस्त ट्रकची कॅबिन बोराखेडीत तर बॉडी बुलडाणा शहर ठाणेच्या हद्दीत,राजूर घाटात चालकाचा नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी

बुलडाणा – 15 मे, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा ते मलकापूर महामार्गावरील राजूर घाटातील देवीच्या मंदिरा जवळील वळणावर मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना 15 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मजेशीर गोष्ट अशी की हा अपघात 2 ठाण्याच्या अगदी सीमा रेषेवर झालेला आहे.ट्रकची कॅबिन (मुंडका) बोराखेडी पोलीस ठाणेच्या हद्दीत आहे तर बॉडी (मागील भाग) बुलडाणा शहर ठाण्याचे हद्दीत आहे.ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या बाजूलाच ठाणेच्या हद्दीचा बोर्ड लागलेलं आहे.

         याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणाकडून कापसाचे गठानी घेऊन एक मालवाहू ट्रक मलकापूरच्या दिशेने दुपारच्या सुमारास जात होता.यावेळी अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळच्या वळणावर घाट उतरत आतांना ट्रक चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक डावी बाजूला पलटी झाला.सुदैवाने यात जीवित हानि झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे राजूर घाटात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.या अपघाता प्रकरणी गुन्हा कोणत्या ठाण्यात दाखल झाला किंवा नाही,हे कळू शकले नाही.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!