बुलडाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुलडाणा जिल्हा भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन
बुलडाणा – 15 मे, मिरर न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाचे उद्या दिनांक 16 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होत आहे.
हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीच्या मागे सकाळी 11 वाजता होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री आकाश फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आ.श्वेता महाले,आ. संजय कुटे,माजी खा. सुखदेव नंदाजी काळे, माजी आ.तोताराम कायंदे, जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या या उद्घाटन सोहळ्याला बुलडाणा जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व सचिन देशमुख यांनी केले आहे.

