ज्ञानगंगा अभयारण्यात 11 बिबट,25 अस्वल तर 6 तडस दिसल्याची प्राणी गणनेत नोंद,पर्यटकांनी घेतला निसर्ग अनुभव

More articles

ज्ञानगंगा अभयारण्यात 11 बिबट,25 अस्वल तर 6 तडस दिसल्याची प्राणी गणनेत नोंद,पर्यटकांनी घेतला निसर्ग अनुभव

बुलडाणा – 13 मे, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा शहराला लागून जाणाऱ्या अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात 12 मे रात्री बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये 11 बिबटे,25 अस्वल,6 तडस यांच्यासह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती बुलडाणा आरएफओ प्रकाश सावळे आणि खामगाव आरएफओ दीपेश लोखंडे यांनी आज 13 मे रोजी दुपारी दिली आहे.

Oplus_131072

           बुलडाणा जिल्ह्यातील बोथा जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा अधिवास असल्या कारणाने शासनाने या जंगलाला 1997 मध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित केले.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांची गणना केली जाते.विभागीय वनअधिकारी अनिल निमजे,एसीएफ चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलडाणा आणि खामगाव या दोन्ही रेंज मध्ये यावर्षी 12 मे रोजी जवळपास 30 मचाणावरून प्राणी गणना करण्यात आली.गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होत असल्याने पर्यटकांसाठी 30 मचाण ठेवण्यात आले होते.41 पर्यटकांबरोबर 20 वनरक्षक,9 वनपाल,2 आरएफओ आणि वनमजुर यांनी ज्ञानगंगा
अभयारण्यात पाणवठ्यावर प्राणी गणना केली.या अभयारण्यात अस्वलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने हे अभयारण्य अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते.या प्राणी गणनेत 11 बिबट,25 अस्वल,6 तडस,8 सायळ, 9 हरीण,2 चिंकारा, 16 भेडकी,69 नीलगाय, 180 रानडुक्कर,115 मोर लांडोर,1 खवल्या मांजरसह एकूण 524 प्राण्यांची नोंद करण्यात आली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना बुलडाणा - 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा...
spot_img
error: Content is protected !!