शेतातील कुंपणात अडकला होता बिबट्या, बुलडाणा वनविभागाने केले रेस्क्यू,अंबाबारवा अभयारण्यात सुखरूप सोडले

More articles

शेतातील कुंपणात अडकला होता बिबट्या, बुलडाणा वनविभागाने केले रेस्क्यू,अंबाबारवा अभयारण्यात सुखरूप सोडले

बुलडाणा – 22 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क

शेतातील भाजीपाल्याच्या सुरक्षेसाठी लावलेल्या कुंपणात 8 ते 9 महिन्याची मादी बिबट अडकल्याची घटना अंभोडा परिसरात 21 एप्रिलच्या सकाळी उघडकीस आली होती.याची माहिती बुलडाणा वनविभागाला मिळताच रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले व या बिबट्याला बेशुद्धीचे डॉट मारून कुंपणातून बाहेर काढण्यात आले. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने या बिबट्याला जिल्ह्यातील अंबाबारवा अभयारण्यात निसर्ग मुक्त करण्यात आले.

        बुलडाणा वन परीक्षेत्रातील मौजे अंभोडा येथील कांताबाई शेषराव पवार यांनी गट क्रमांक 28 मध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे.वन्यप्राणी व इतर प्राण्यापासून भाजीपाला सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी शेताला दोरीची जाळीचे कुंपण लावलेले आहे.या कुंपणात एक मादी बिबट अडकल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. याची माहिती वनविभागाला मिळाल्यावर बुलडाणा वनपरीक्षेत्र अधिकारी तथा रेसक्यू टिम प्रमुख अभिजीत ठाकरे आपली रेसक्यु टिम सोबत सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता बिबट पुर्ण पुणे शेत कुंपणाच्या जाळीत अडकलेला होता. पशुधन विकास अधिकारी बुलडाणा यांच्या उपस्थितीत केमीकल रेसक्यु करण्याचा निर्णय घेऊन शूटर संदीप मडावी यांनी बेशुद्धीचा डॉट मारून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.सदर बिबटची प्राथमिक तपासणी करुन बिबट मादी सुदृढ असल्याचे बुलडाणा पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या बिबट्याला दिनांक 21 एप्रिलच्या संध्याकाळी अंबाबरवा अभयारण्यातील आडनाला येथे निसर्ग मुक्त करण्यात आले आहे.सदर कार्यवाही बुलडाणा डीएफओ सरोज गवस,एसीएफ अश्विनी आपेट,बुलडाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मोहसिन खान रेस्क्यू टीमचे शुटर संदीप मडावी, अमोल चव्हाण,पवन वाघ पवन मुळे,संघपाल तायडे, समाधान शिंदे व खंडोबा गावकरी यांनी पार पाडली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!