“लग्नात डफडे वाजवायचे नाही”
चौघांनी केली एकास मारहाण,सोयगाव येथील घटना,चौघांविरुध्द धाड ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा – 21 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
अनेक वर्षापासून मातंग समाजाचे लोक लग्नात डफडे वाजविण्याचे काम करतात परंतु आता नविन पिढीला हे काम अमान्य आहे. याच कारणामुळे बुलडाणा तालुक्यातील सोयगाव गावात राहणा-या एका व्यक्तीला लग्नात डफडे वाजवायचे नाही, या कारणावरुन चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना 20 एप्रिलच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नूसार, फिर्यादी कौतीक साहेबराव महाले 42 वर्ष रा. सोयगाव यांना तु लग्नामध्ये डफडे का वाजवितो. लग्नामध्ये डफडे वाजवाचे नाही. या कारणावरुन फिर्यादी सोबत आरोपी अमोल गुलाबराव महाले वय 35 वर्ष, अनिल गुलाबराव महाले वय 26 वर्ष, अंकुश राजाराम निकाळजे वय 40 वर्ष आणि सोनु रमेश निकाळजे वय 20 वर्ष सर्व रा.सोयगाव ता. जि. बुलडाणा यांनी संगनमत करुन लोखंडी रॉड तसेच लाथा बुक्यांनी जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच तुला जीवानिशी मारुन टाकू अशी धमकीही फिर्यादीला दिली.या प्रकरणी फिर्यादी कौतीक महाले यांच्या तक्रारीवरुन वरिल चारही आरोपींविरुध्द धाड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करीत आहे.

