दुधाचे वाहन संकटात???
“अमर” नंतर “विकास”च्या वाहनाचा बुलडाण्यात अपघात,दुभाजक व वाहनांचे नुकसान,चालक किरकोळ जखमी
बुलडाणा – 21 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
चिखलीकडून मलकापूरच्या दिशेने जाणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजाला धडकले.यात चालक किरकोळ जखमी झाला आहे.हा अपघात आज 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील त्रिशरण चौका जवळ “डाईट” समोर घडला आहे.विकास दूधचे वाहन हे चिखली कडून जळगांवला जात होते.सकाळी बुलडाणा येथे पोहोचल्यानंतर चालकाचा वाहणावरील नियंत्रण सुटला आणि वाहन दुभाजकाला घासून पुढे गेले यात दुभाजक व वाहनांचे नुकसान झाले आहे.सकाळी अपघात होऊन दुपारी 4 वाजे पर्यंत वाहन अपघातस्थळी उभेच होते.
दुधाच्या वाहनावर संकट???
बुलडाणा तालुक्यातील धाड येथील “अमर डेअरी”च्या दूध संकलन केंद्रातून दूध घेऊन बोदवडकडे जाणाऱ्या टँकरचे ब्रेक फेल होऊन टँकर पलटी झाल्याची घटना काल 20 एप्रिल रोजी राजूर घाटात घडली आणि आज बुलडाणा शहरात “विकास” दुधाच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

