नवीन ठाणेदाराला सलामी,5 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अटक
बुलडाणा – 16 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तडका फडकी बदली केली आणि त्यांच्या ठिकाणी होम डिवायएसपी रवी राठोड यांनी आज 16 एप्रिलला सायंकाळी आपला पदभार स्वीकारला.इकडे पदभार स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असताना बुलडाणा शहर ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी अनिल कुकडे यांना 5 हजारांची लाच स्वीकारताना बुलडाणा एसीबीच्या पथकाने कारंजा चौकात अटक केली आहे. एकंदरीत नवीन ठाणेदाराला पोलीस कर्मचाऱ्यांनी अनोखी सलामी दिल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

