मशिद,दर्गाहवर झेंडा फडकवणे हे चुकीचं,विश्व हिंद परिषदेचे पश्चिम क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांचं वक्तव्य
बुलडाणा – 10 एप्रिल, मिरर न्यूज नेटवर्क
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या स्थापनेला 60 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.आज 10 एप्रिल रोजी दुपारी बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या पत्रकार परिषदेला संबोधित करतांना विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी सांगितले की,हिंदूच्या लोकसंख्ये मध्ये घट होत आहे.त्यामुळे हिंदूनी 2 किंवा 3 आपत्य जन्माला घालावी.एका प्रश्नाचा उत्तर देतांना ते म्हणाले की, मशिद,दर्गाहवर झेंडा फडकवणे हे चुकीचं आहे.
पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना त्यांनी सांगितलं की,परिवार नियोजनातील विविध कारणांमुळे हिंदूची संख्येत घट होत आहे. लव्ह जिहादबाबत मुलींमध्ये जनजागृती करण्याचे काम विश्व हिंदू परिषद करीत आहे. तसेच गोहत्या रोखण्यासाठी कठोर कायदे करावे.गोहत्येसाठी जो ट्रक वापरला जातो त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मालकावर गुन्हा दाखल करून वाहन कायमचा जप्त करण्यात यावा.हिंदूचें सण साजरे होत असतांना काही मिरवणूकांमध्ये हल्ले केले जात आहे.यामध्ये जाळपोळ करून देशाच्या संपत्तीचे नुकसान होत आहे.मंदिरांची सुरक्षा झाली पाहिजे.त्याचप्रमाणे हिंदूनी हिंदू म्हणून जगावे हिंदू नी सेक्युलर होऊ नाही.सर्व धर्माचा आदर करावा आपल्या धर्मावर ठाम रहावे असे सांगितले.
यावेळी विश्व हिंदू परिषद बुलडाणा महामंत्री महादेव गुंडाळे, बुलडाणा शहराध्यक्ष उत्कर्ष डाफणे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक मयुर करे यांची उपस्थिती होती.

