धावत्या रेल्वेतून उतरने बेतले जीवावर, मलकापूर रेल्वे स्टेशनची घटना, प्रवाशाच्या उपचारादरम्यान मृत्यू
बुलडाणा – 7 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
हैदराबाद येथून परत येत असताना मलकापूर रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना एक व्यक्ती रेल्वे व प्लॅटफॉर्म मध्ये अडकला होता यात त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.ही घटना काल 6 एप्रिलला दुपारी घडली होती.
या बाबत प्राप्त माहिती अशी की दिलक्षीसिंह दिघडी भोसले वय 49 वर्ष रा. लालगोटा,ता.मुक्ताईनगर जि.जळगाव हे काही कामानिमित्त हैदराबादला गेले होते.काल रविवारी ते रेल्वेने परत गावाकडे आले.मलकापूर रेल्वे स्टेशनवर त्यांना उतरायचे होते परंतु ट्रेन सुरू झाली व धावत्या रेल्वेतून त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला व ते खाली पडून प्लॅटफॉर्म व ट्रेन मध्ये अडकले यात त्यांना गंभीर दुखापत झाली. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता उपचारा दरम्यान त्यांचं मृत्यू झाला आहे.या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास शेगांव जीआरपीला वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज 7 एप्रिल रोजी दिली आहे.

