दहीद येथे 2 लाख 53 हजाराची धाडसी घरफोडी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद,बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल

More articles

दहीद येथे 2 लाख 53 हजाराची धाडसी घरफोडी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद,बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल

बुलडाणा- 7 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील दहीद बु.येथील एका बंद घराचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाकडी अलमारीतून 6 तोळे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 2 लाख 40 हजार रुपये व नगदी 13 हजार असे एकूण 2 लाख 53 हजार लंपास केल्याची घटना 4-5 एप्रिलच्या मध्यरात्री घडली असून याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज 7 एप्रिलला सायंकाळी दिली आहे.हातात लाठ्या – काठ्या व लोखंडी रॉड घेऊन घरफोडी करणारे अज्ञात 4 ते 5 चोरटे गावातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबत फिर्यादी जिजाबाइ ज्ञानदेव देवकर वय 75 वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादी हया त्यांचे पुतण्याचे घरी झोपण्यासाठी गेल्या असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराचे समोरील दरवाजाचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटातील 6 तोळे सोन्याचे दागीने एकुण किंमत 2 लाख 40 हजार रुपये व नगदी 13 हजार रुपये असा एकुण 2 लाख 53 हजार रुपयाचा मुददेमाल चोरुन नेला आहे. अशा तोंडी रिपोर्ट वरुन बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि शस्द माळी पुढील तपास करीत आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!