गांव हादरलं,,14 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन का केली आत्महत्या????
बुलडाणा – 7 एप्रिल, मिरर न्युज नेटवर्क
एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने टाकरखेड गावातील विजयनगर भागात असलेल्या अंगणवाडीच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल 6 एप्रिलला दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघळकीस आली आहे या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील रहिवासी पवन गजानन जुनारे या 14 वर्षीय विद्यार्थ्याने विजयनगर भागात असलेल्या अंगणवाडीच्या परिसरात गळफास घेतली.ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी धावपळ करून पवनला खाली उतरवले व बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.आज 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.मृतक पवन हा दहाव्या वर्गात शिकत होता त्याने इतका टोकाचा पाऊल का उचलला?? हे अद्याप कळू शकले नाही.ही घटना उघडकीस आल्यानंतर गाव हादरून गेले होते.

