बुलडाणा,देऊळघाट येथे वक्फ संशोधन कायद्याच्या विरोधात काळ्या फिती बांधून मुस्लिम बांधवांनी केला निषेध व्यक्त
बुलडाणा – 28 मार्च, मिरर न्युज नेटवर्क
वक्फ संशोधन कायदा 2025 हा मुस्लिम समाजावर अन्याय करणारा असून या कायद्याच्या माध्यमाने मुस्लिम समाजाला त्यांच्या मस्जिद,ईदगाह,मदरसे, दर्गा,खानकाह,कब्रिस्थान यापासून वंचित करणे आहे. हा बिल आणून केंद्र सरकार मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर डोळा ठेवून आहे तसेच ज्या लोकांनी वक्फच्या जमिनीवर अवैध कब्जा केलेला आहे ते जमिनी सुद्धा त्याच लोकांना दिल्या जाणार आहे.या अन्यायकारक कायद्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र विरोध होत आहे.
याचाच एक भाग म्हणून आज पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी म्हणजे जुमातुलविदाच्या दिवशी मुस्लिम पर्सनल बोर्डने या कायद्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज 28 मार्चला दुपारी 2 वाजेच्या सुमारास शुक्रवारच्या मुख्य नमाजच्या वेळी बुलडाणा येथील जामा मस्जिद,दारुस्सलाम मस्जिद तसेच देऊळघाट येथील नवाबिया मस्जिद समोर मुस्लिम बांधवांनी हातावर काळ्या फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत वक्फ संशोधन कायद्याचा लोकशाही मार्गाने विरोध केला आहे.

