पूजा खेडकरच्या तसूभर ही कमी नाही बुलडाण्याचे जिल्हाधिकारी,शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांचं गंभीर आरोप
बुलडाणा – 26 मार्च, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या पदाच्या अधिकारात नसतानाही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नेमणूक केलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे,एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी ही तक्रार विभागीय आयुक्ताकडे केल्याची माहिती त्यांनी आज 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दिली आहे.
बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने 5 सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, त्यामध्ये रवींद्र लहाने हे निवृत्त होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक होते,सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची कंत्राटी नियुक्ती करत त्यांना दुसऱ्या कार्यालयात आस्थापनेवर दाखवण्यात आले असून मात्र आजही ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये स्वीय सहायक म्हणूनच काम करत असल्याचा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे, आर्थिक देवाण-घेवाण आणि भ्रष्टाचारासाठीच ह्या नियुक्त्या केल्या गेले तसेच पूजा खेडकरच्या तसूभर ही कमी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी नाही,असा आरोप देखील यावेळी संतोष भुतेकर यांनी केला आहे.

