शावक व आईच्या पुनर्मिलनसाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू, मकाच्या शेतात आढळला बिबट्याचा शावक

More articles

शावक व आईच्या पुनर्मिलनसाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू, मकाच्या शेतात आढळला बिबट्याचा शावक

बुलडाणा – 9 मार्च, मिरर न्युज नेटवर्क

नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार शिवाराच्या एका शेतात बिबट्याचा एक ते दिड महिन्याचा शावक आढळून आला आहे. त्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून,मादी बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

          नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखर्डा ढोकने यांची गावा जवळ शेती असून शेतीला लागूनच नाला आहे.सुनील ढोकने हे आज 9 मार्चला सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना शेतातील मका पिकात बिबट्याचे एक ते दिड महिन्याचा शावक दिसून आला त्यामुळे मादी बिबट जवळच असेल अशी शंका आल्याने शेतकरी सुनील ढोकने यांनी तात्काळ मोताळा वनविभागाला याची माहिती दिली असता आरएफओ किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनात वनपाल ए.एन.सपकाळ,वनरक्षक एल.डी.राठोड,सिरसाट, चालक वैभव फुंड यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या शावकाला ताब्यात घेऊन आसपासच्या शेतशिवारात मादी बिबट्याचा शोध घेतला.परंतु बिबट्या मिळून आले नाही.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने मादी बिबट आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ला करू शकते या भितीमुळे वनविभागाच्या पथकाने नागरिकांना घटनास्थळा पासून दूर करून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.आज रात्री बिबट्याचा शावक व त्याच्या आईचा पुनर्मिलन व्हावा यासाठी वन विभागाने घटनास्थळी जाऊन प्रयत्न सुरू केले आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!