“ड्रंक अँड ड्राईव्ह”,,,,, पुलिस है तो सब माफ है क्या?????बुलडाण्यात मद्यधुंद पोलिसाने बोलरोचा केलं अपघात,सुदैवाने जीवित हानी टळली,एसपी साहेब या पोलिसांवर काय कारवाई करणार???

More articles

“ड्रंक अँड ड्राईव्ह”,,,,,
पुलिस है तो सब माफ है क्या?????बुलडाण्यात मद्यधुंद पोलिसाने बोलरोचा केलं अपघात,सुदैवाने जीवित हानी टळली,एसपी साहेब या पोलिसांवर काय कारवाई करणार???

बुलडाणा – 7 मार्च,मिरर न्युज नेटवर्क

पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकळे हे दोन दिवसीय बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसत आहे.”ड्रंक अँड ड्राईव्ह” करू नका अशा सूचना नेहमी पोलीसाकडून केल्या जातात.एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने भरधाव वेगात बोलेरो जीप चालवून अपघात केला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ही घटना काल 6 मार्चला रात्री 9 वाजेच्या सुमारास एडेड शाळे जवळ बाजी प्रभु देशपांडे यांच्या पुतळ्या समोर घडली आहे.

              याबाबत प्राप्त माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रावसाहेब मुंडे हे बुलडाणा शहरातील विष्णूवाडी परिसरात राहतात.काल रात्री त्यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील बोलेरो जीप क्र. MH 32 C 1955 निष्काळजी पणाने चालवून वाहन नालीत टाकले. हा मार्ग वरदडी असून याच मार्गावर बरेचसे शाळा, शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थ्यांची संख्या या मार्गावर जास्त असते. थोडावेळ अगोदर जर हा अपघात झाला असता तर निश्चितच मोठी जीवित हानी झाली असती. असा अंदाज काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला आहे. अपघात झाल्यानंतर काही नागरिकांनी बुलडाणा शहर पोलिसांना याची सूचना दिली होती, हे विशेष. या अपघातानंतर दारूच्या नशेत तर असलेला पोलीस कर्मचारी आपल्या गुरमीत होता. घटनेची माहिती त्याच्या घरी पोहोचतात घरच्यांनी त्याला परत घरी नेले. काही लोकांनी त्याची जीप बाहेर काढून घरी पोहोचवली.आता प्रश्न असा उपस्थित होतो की हाच अपघात जर सामान्य नागरिकाकडून घडला असता तर त्याच्यावर पोलीस कारवाई निश्चितच झाली असती. परंतु साहेबराव मुंडे हा पोलीस कर्मचारी आहे त्याने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवली आणि अपघात केला. आता याच्यावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विश्व पानसरे काय कारवाई करणार? असा प्रश्न बुलडाणेकरांना पडला आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!