बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा दमदार विस्तार, आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी एबीपी माझाचे डॉ.संजय महाजन तर सचिव पदी आदेश कांडेलकर

More articles

बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा दमदार विस्तार, आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी एबीपी माझाचे डॉ.संजय महाजन तर सचिव पदी आदेश कांडेलकर

बुलडाणा – 8 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क

पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषेशी संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा विस्तार तीव्र गतीने सुरू असून 8 जानेवारीला संध्याकाळी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या आरोग्य सेलच्या दोन महत्त्वपूर्ण पदांची घोषणा करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने डॉ.संजय महाजन यांची आरोग्य सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली असून सचिव पदाची जबाबदारी आदेश कांडेलकर यांच्याकडे देण्यात आली आहे. समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करतो. आपल्या पत्रकार बांधवांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांना आरोग्य संबंधी भेटणारे प्रश्न योग्य मार्गदर्शन आणि उपचारातून सोडवले जावे, या प्रामाणिक हेतूने आरोग्य सेल काम करतो. त्यामुळे बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या आरोग्य सेलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा आरोग्य सेलचे अध्यक्ष डॉक्टर संजय महाजन आणि सचिव आदेश कांडेलकर पत्रकारांचे आरोग्य जपण्याचे काम उत्कृष्टपणे करतील, अशी अपेक्षा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. डॉ. संजय महाजन हे एबीपी माझा या नावाजलेल्या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी असून सामाजिक प्रश्नांची जाण असलेले पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. तर आदेश कांडेलकर यांनी सुद्धा विविध मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!