बुलडाणा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम हिंगे अविरोध तर सचिव पदी इसरार देशमुख कार्याध्यक्ष राहुल दर्डा
पत्रकार संघाची बुलडाणा शहर कार्यकारणी जाहीर
बुलडाणा – 8 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची आज 8 जानेवारी रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवन या ठिकाणी शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नव नियुक्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. बुलडाणा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून राम हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष समाधान चिंचोले, सुनिल मोरे, कार्याध्यक्ष राहुल दर्डा, सचिव इसरार देशमुख, कोषाध्यक्षपदी अजय राजगुरे, सहसचिव रमेश जाधव,सहसचिव ओम कायस्थ,शहर संघटक सय्यद ईरफान,सहसंघटक विनोद सावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसिम शेख, प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ,सहसविचव शिवाजी मामलकर, महिला सेलच्या अध्यक्ष मृणाल सावळे, पत्रकार हल्ला कृती समितीचे राजेश डिडोळकर, जितेंद्र कायस्थ, गणेश निकम, बाबासाहेब देशमुख, रहेमत अली शाह, अभिषेक वरपे, प्रकाश जेऊघाले,गणेश सोनुने, आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.