मित्रा सोबत सहलीला जाने पडले महाग,स्कूल बसला कारने दिलेल्या धडकेत तरुण ठार,मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना
बुलडाणा – 23 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क
शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात आलेली कारने जोरदार धडक दिली, या धडकेत बस समोर उभा राहून इंजिनमध्ये पाणी टाकत असलेल्या 34 वर्षीय तरुणाला जोरदार मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मोताळा-नांदुरा मार्गावरील मोताळा येथील विद्युत सबस्टेशन जवळ 23 डिसेंबरच्या रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळगाव जामोद येथे लईक देशमुख हे खाजगी शिकवणी वर्ग चालवतात.काल रविवारी सकाळी ते काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गेले होते.त्यांनी सोबत आपला मित्र मो.मुसअब अब्दुल जाबीर वय 32 वर्ष (खाजगी संस्थे वरील लिपिक) यालाही घेतले. रात्री उशिरा जळगाव जामोदकडे परत येत असताना स्कूल बसचा इंजन गरम झाला होता म्हणून मोताळा जवळच्या विद्युत सबस्टेशन समोर त्यांनी बस थांबवली तेव्हा मो.मुसअब खाली उतरुन इंजिन मध्ये पाणी टाकत असताना समोरून भरधाव वेगात आलेली कारने स्कूल बसला समोरून जोरदार धडक दिली.यात मो.मुसअब याला जोरदार मार लागला.त्याला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले.या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात कार चालक अखिलेश विजय चौधरी रा.नांदुरा याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.