“त्या” मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना
बुलडाणा – 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क
शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे अस्वलाने हल्ला केल्याची घटना आज 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पळसखेड सपकाळ शिवारात घडली आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमी व्यक्तीच्या चेहऱ्यावर एकच घाव असल्याने हा खरंच असवलाचाच हल्ला आहे का?असं प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बाबत जखमी व्यक्तीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील रहिवासी दीपक काशिनाथ काळे वय 36 वर्ष हा मतिमंद आहे. गावात तसेच शेत शिवारात तो फिरत असतो व आपल्या शेतात देखील जातो.आज रविवारी तो शेतात गेला होता. सायंकाळी घरी परत येत असताना अचानक एका अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला.त्यावेळी दीपकचे काका मदन काळे हे बाजूच्या शेतात असल्याने ते आवाज ऐकून धावून आले म्हणून अस्वलाने तिथून पळ काढला.या हल्ल्यात दीपक काळे यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच बुलढाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांच्या सूचनेवरून बुलढाणा वनपाल मोहसीन खान हे देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले होते.