बोथा घाटात “चल यार धक्का मार”,,बुलडाणा आगाराच्या भंगार बसेस धावत आहे रस्त्यावर, प्रवाशांना मारावा लागलं धक्का
बुलडाणा – 31 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा आगारातील भंगार बसेस रस्त्यावर धावत आहे.बसेसच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष होत असल्याने हे भंगार बसेस कुठेही बंद पडतात,घाटात लोड घेत नाही त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अशीच घटना आज 31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बुलडाणा – खामगाव मार्गावरील बोथा घाटात घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा आगाराची बस दुपारी अमरावतीहून निघाली होती.खामगाव मार्गे बुलडाणाकडे येत असताना या बस मध्ये सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी होती. अशात बोथा घाट चढत असतांना ही बस लोड घेत नव्हती, त्यामुळे चालकाने सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरून दिले व प्रवाशांना पूर्ण घाट पायी चालत पार करावे लागले.बोथा घाट म्हणजे हा ज्ञानगंगा अभयारण्य असून या ठिकाणी बिबट, अस्वल,तडस सारखे अनेक हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे.भर जंगलात प्रवाशांना पायी जावा लागला अशात एखाद्या वन्यप्राण्याने प्रवाश्यावर हल्ला केला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलडाणा आगार प्रमुखांनी बसेसच्या मेंटेनेस कडे लक्ष द्यावे जेणेकरून प्रवाशांना अशा प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही.