नांदुरा जवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक,2 शेतमजूर ठार, संतप्त शेकडो नागरिकांचा रास्ता रोको

More articles

नांदुरा जवळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक,2 शेतमजूर ठार, संतप्त शेकडो नागरिकांचा रास्ता रोको

बुलडाणा – 29 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क

नागपूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली यात 2 शेतमजुरांचा मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज 29 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजेच्या सुमारास नांदुरा जवळच्या वडी परिसरात घडला आहे. सर्विस रोड तात्काळ करण्यात यावा या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी महामार्गावर चक्काजाम केलेला आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, नांदुरा तालुक्यातील काही मजूर ट्रॅक्टर मध्ये बसून शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना वडी फाट्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये एक महिला जागीर ठार झाली असून दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 शेतमजूर जखमी झाले आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत स्थानिक आमदार येत नाही तसेच सर्विस रोड होत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल झालेले आहे तर आमदार राजेश एकडे यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!