ब्रेKING!!!माजेल वाळू तस्कराचा “हिट अँड रन” टिप्परने मागून ट्रॅक्टरला दिली धडक, 9 जण गंभीर जखमी,बुलडाणा-धाड मार्गावरील घटना

More articles

माजेल वाळू तस्कराचा “हिट अँड रन” टिप्परने मागून ट्रॅक्टरला दिली धडक, 9 जण गंभीर जखमी, बुलडाणा-धाड मार्गावरील घटना

बुलडाणा – 26 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका भारधाव टिप्परने सोयाबीनचे पोते नेणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली यात ट्रॉली पलटी होऊन 9 मजूर पोत्या खाली दबून जखमी झाले असून त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविले आहे.बुलडाणा – धाड मार्गावरील तांदुळवाडी शिवारात हा अपघात 26 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.या अपघातातील जखमींना स्थानिकांनी तातडीने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले होते. या अपघातानंतर वाळू तस्कर आपल्या टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता.
या बाबत प्राप्त माहिती अशी की,बुलडाणा येथील गायरान परिसरातून सोयाबीनचे पोते घेऊन ट्रॅक्टर धाड मार्गावरून अंभोड्याला जात होते. यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक्टरची ट्रॉली उलटून त्यातील सोयाबीनच्या पोत्याखाली मजूर दबले होते.जखमी अमोल फकीरा पवार,अक्षय बावस्कर, नितीन दिलीप सुरशे,श्रावण गुलाबराव काकफडे, गजानन उत्तम बावस्कर,सचिन सुभाष गायकवाड,वासुदेव भीमराव उबाळे,सावन रमेश थोरात सर्व रा. आंबोडा ता.जि.बुलडाणा तसेच हरिदास संतोष शिंदे रा सातगांव म्हसला ता.जि.बुलडाणा यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यातील श्रावण काकफडे आणि नितीन सुरशे या दोघांना छत्रपती संभाजी नगरला रेफर करण्यात आले आहे. या अपघाता नंतर माजेल टिप्पर चालक जखमींना मदत करण्याऐवजी टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. अपघाताची माहिती मिळाल्याने बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी पथक घटनास्थळी रवाना केले व जखमींचे बयान देखील जिल्हा रुग्णालयात नोंदविण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकही वाळू घाट सुरू नसताना देखील सर्रासपणे वाळू माफियांनी धुमाकूळ माजवलेला आहे. दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवत असताना सुद्धा जिल्हा प्रशासन गप्प का बसले??? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

"त्या" मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना बुलडाणा - 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे...
spot_img
error: Content is protected !!