बुलडाणा – चिखली महामार्गावर रोहीची 3 वाहनांना धडक,रोहीसह 4 जण जखमी
बुलडाणा – 9 ऑक्टोबर, मिरर न्युज नेटवर्क
बेभान धावत महामार्ग ओलांडणाऱ्या एका भारीभरकम रोहीने 2 दुचाकीसह एका एपेला जोरदार धडक दिली.या घटनेत 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जखमींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ही घटना आज 9 ऑक्टोंबरला दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुलडाणा – चिखली महामार्गावरील हातनी शिवारात घडली आहे.
बुलडाणा – चिखली महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.हातनी, केळवद या परिसरात मोठ्या प्रमाणात रोही असल्याने येथील शेतकरी त्रस्त झालेले आहे.अनेक वेळा रोही हा महामार्ग ओलांडत असतात.आज बुधवारला दुपारी महामार्ग ओलांडणाऱ्या रोहीने दोन दुचाकी तसेच एका एपेला धडक दिली यात रोहीसह 4 ते 5 जण जखमी झाले आहे.या जखमींना उपचारासाठी चिखली येथे हलविण्यात आले तर जखमी रोही महामार्गाच्या बाजूला एका नालीत जाऊन पडले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा एसीएफ अश्विनी आपेट यांनी वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना केली.जखमी रोहीला बेशुद्ध करून उपचारासाठी बुलडाण्यात आणले.