इलेक्ट्रिक पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी,2 मजूर ठार तर 4 जखमी, बुलडाणा जिल्ह्यातील पुन्हई जवळची घटना
बुलडाणा – 22 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क
नवीन इलेक्ट्रिक पोल घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 4 मजूर जखमी झाले आहे.ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील पुन्हई गावाजवळ आज 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की मोताळा तालुक्यातील पुन्हई नवीन विद्युत लाईनचे काम सुरू आहे.या कामासाठी आज रविवारी फुली येथून एका ट्रॅक्टर मध्ये इलेक्ट्रिक पोल पुन्हई येथे घेऊन जात असतांना बोराखेडी ते पुन्हई रोडवर अचानक ट्रॅक्टर पलटी झाले व वजनदार पोल ट्राली मध्ये बसलेल्या मजुरांवर पडले.यात रामदास पुंजाजी बेलोकार वय 40 वर्ष आणि मंगेश ज्ञानदेव सातव वय 32 वर्ष दोघे, रा. वाडी ता.नांदुरा जागीच ठार झाले तर संतोष बेलोकार वय 45 वर्ष, शुभम खंडारे वय 22 वर्ष, संतोष सातव वय 38 वर्ष आणि हर्षल बेलोकार वय 20 वर्ष सर्व रा.रा. वाडी ता.नांदुरा गंभीर जखमी झाले.सर्वाना उपचारासाठी बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मृतकाचे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले आहे.