विनापरवानगी बुलडाणा शहर ठाण्यात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे 90 आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल,,,यांचं आहे समावेश

More articles

विनापरवानगी बुलडाणा शहर ठाण्यात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे 90 आंदोलनकर्त्यावर गुन्हा दाखल,,,यांचं आहे समावेश

बुलडाणा – 17 सप्टेंबर, मिरर न्युज नेटवर्क

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक होत
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत जोपर्यंत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला.काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचं जमावबंदी आदेश लागू असतांना पोलीस ठाण्यात विनापरवानी आंदोलन करत घोषणाबाजी केली.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा उल्लंघन केल्याने काँग्रेस विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी,आ.धिरज लिंगाडे रा.बुलडाणा,आ. राजेश एकडे रा.नांदुरा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे रा. चिखली, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ रा. बुलडाणा,सुनिल सपकाळ रा.बुलडाणा, संजय पांढरे रा. केळवद,दत्ता काकस रा. बुलडाणा, मीनल आंबेकर रा. बुलडाणा, जयश्री शेळके रा. बुलडाणा,स्वाती वाकेकर रा.जळगाव जामोद, मंगला पाटील रा.मलकापुर, हरीश रावळ रा.मलकापुर, भगवान धांडे,गजानन मामलकर रा.मोताळा, भूषण मापारी रा.लोणार, साहेबराव पाटील रा. लोणार,रिजवान सौदागर रा.धाड,अनिल सावजी रा. देऊळगाव राजा, रामभाऊ जाधव रा.हातणी, डॉ.अरविंद कोलते रा. मलकापुर,अतुल शिरसाट रा.खामगाव,श्याम उमाळकर रा.मेहकर, लक्ष्मणराव घुमरे रा. बुलडाणा, समाधान पुंडलिक दामधर रा. जळगाव जामोद, विजय अंभोरे रा. बुलडाणा, संजय राठोड रा.बुलडाणा, मोहम्मद आसिफ इकबाल तफुझ्झुल हुसेन रा.जामोद, एकनाथ चव्हाण रा.डाभा, आश्विन जाधव रा.चिखली, डॉ.ईसरार अहमद रा. चिखली, शेख मोहसिन शेख अन्सार रा.बुलडाणा व इतर 50 ते 60 पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दळवी यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

"त्या" मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना बुलडाणा - 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे...
spot_img
error: Content is protected !!