महसूल प्रशासनाने जप्त केलेला रेतीसाठा अज्ञात वाळूमाफियाने नेला चोरून,पोलीसात गुन्हा दाखल,धाड पोलिसांना वाळूमाफियाला पकडण्याचे आव्हान
बुलडाणा – 10 सप्टेंबर, मिरर न्यूज नेटवर्क
बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे.अधून मधून महसूल प्रशासनाकडे कारवाई केली जाते मात्र धाड पोलीस ठाण्यासमोर समोरून खुलेआम रात्रीच्या वेळी वाळू तस्करी होत असतांना देखील पोलीस प्रशासन डोळे झाकून असतात.त्यामुळेच धाड परिसरातील रेती माफिया बेलगाम झालेले आहे.चांडोळ येथे मगदूम प्रशासनाने जप्त केलेला वीस ते पंचवीस ब्रास रेती साठा अज्ञात रेतीमाफी आणि चोरून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
बुलडाणा तालुक्यातील चांडोळ गावाजवळ बेलोरा जाणाऱ्या रस्त्याला लागून हनुमान मंदिराजवळ 20 ते 25 ब्रास रेतीसाठा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या आदेशाने तलाठी अभिजीत पाटील यांनी 6 जूनला जप्त केला होता.तसेच सदर रेतीसाठ्याचा पंचनामा करून तो कोतवाल सुरेश जाधव यांच्या ताब्यात देण्यात आला होता.त्याच दिवशी गट क्रमांक 427 मध्ये दुसरा 20 ते 25 ब्रास रेतीसाठा जप्त करून तो लिलावद्वारे राजेंद्र फकीरासिंग धनावत यांना लिलावा करून विकण्यात आला होता.अशात हनुमान मंदिराजवळ असलेला रेतीसाठा हा लिलाव ना झाल्यामुळे तो त्याच ठिकाणी पडून होता. दिनांक 7 सप्टेंबर रोजी तलाठी अभिजीत पाटील व कोतवाल सुरेश जाधव हे हनुमान मंदिराजवळ गेले असता त्या ठिकाणी रेती साठा आढळून आला नाही. तो रेतीसाठी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची बाब उघडकीस आल्यानंतर बुलडाणा तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रानुसार तलाठी अभिजीत पाटील यांच्या तक्रारीवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध 9 सप्टेंबर रोजी धाड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हटल्या जातात की “कानून के हात लंबे होते है” बघू आता या प्रकरणात धाड पोलिस वाळू माफियाला पकडू शकेल का?