रायपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी अरुण झाल्टे यांचं उपचारादरम्यान मृत्यू
बुलडाणा – 18 ऑगस्ट, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अरुण चंद्रकांत झाल्टे यांचे अल्प आजाराने 18 ऑगस्टला रात्री 1 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.
15 ऑगस्टला रायपूर ठाण्यात धवजारोहन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अरुण झाल्टे आपल्या चिखली येथील घरी सकाळी तयारी करत असतांना अचानक चक्कर येऊन झालटे खाली पडून बेशुद्ध झाले.आगोदर चिखली व नंतर छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले,अशात उपचार सुरू असतांना त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या या अकाली निधनाने संपूर्ण रायपूर पोलीस ठाणे हद्दीत शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 10 वाजता चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.