घर तिथे शिवसैनिक,गाव तिथे शाखा,शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह निमित्त देऊळघाट जिल्हा परिषद सर्कलची बैठक

More articles

घर तिथे शिवसैनिक,गाव तिथे शाखा,शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह निमित्त देऊळघाट जिल्हा परिषद सर्कलची बैठक

बुलडाणा – 4 ऑगस्ट, मिरर न्युज नेटवर्क

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात तसेच बुलडाणा वन मिशनचे संदिप शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने भगवा सप्ताह राबविण्यात येत आहे.आज दिनांक 8 ऑगस्टला श्री.स्वयंप्रकाश महाराज मठ कोलवड येथे देऊळघाट जिल्हा परिषद सर्कलमधील प्रत्येक गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख,बूथ प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत शिवसेना सदस्य नोंदणी,बी एल ए नियुक्ती, नव मतदारांची नावे नोंदविणे,घर तिथे शिवसैनिक,गाव तिथे शाखा बांधणी करणे तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या गावात शिवसेनेचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी आपण सर्वजण कामाला लागावे यासाठी मान्यवरांनी सूचना दिल्या.
          यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर,किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, उपतालुका प्रमुख संजय गवळी, विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, जनसेवक मोहम्मद सोफियान, बबन खरे, सरपंच संजय शिंदे, उपसरपंच राजु मुळे यांच्यासह देऊळघाट, बिरसिंगपूर, सागवन, कोलवड, नांद्राकोळी, दत्तपूर, उमाळा येथील शाखा प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

"त्या" मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना बुलडाणा - 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे...
spot_img
error: Content is protected !!