एसटी विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे यांच्या मनमनीला “ब्रेक” तर शुभांगी शिरसाठ यांच्या हाती विभागाचा “स्टेरिंग”
तडकाफडकी गोठवण्यात आले अधिकार

बुलडाणा – 4 ऑगस्ट, मिरर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा विभागाचे विभाग नियंत्रक अशोककुमार महादेवराव वाडीभस्मे यांच्या विरोधात अनेक कर्मचारी व संघटनांच्या गंभीर तक्रारी असल्यामुळे त्या तक्रारीची महामंडळाच्या वरिष्ठ पातळींवर दखल घेण्यात आली असून वाडीभस्मे यांचे पंख छाटण्यात आल्याची जोरदार चर्चा विभाग सुरू आहे.वाडीभस्मे यांच्या मनमानी कारभाराला “ब्रेक” लावत त्यांच्याकडे असलेले सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॅा.माधव कुसेकर यांच्या आदेशाने गोठवण्यात आले आहे.तर शुभांगी यशवंत शिरसाठ विभाग नियंत्रक अकोला यांच्या हाती बुलढाणा विभाग नियंत्रक पदाचा “स्टेरिंग” सोपविण्यात आला आहे.आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार शुभांगी यशवंत शिरसाठ यांना सोपविण्यात आला आहे.

