एमआईएमचे माजी शहर अध्यक्ष शाकीर रज़ा यांचा आ.संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवेसनेत प्रवेश
बुलडाणा – 3 ऑगस्ट, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा विधानसभा मतदारसंघचे आमदार संजय गायकवाड यांचा नेतृत्वात इंदिरा नगर येथील रहिवासी तथा बुलडाणा एमआयएमचे माजी अध्यक्ष शाकिर रजा यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह 2 ऑगस्टला दुपारी मातोश्री जनसंपर्क कार्यालयात शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, जावेद शेख यांच्या मार्गदर्शन मध्ये त्यांनी हा प्रवेश घेतला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाती धर्माचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले आणि करीत आहे. त्यांनी बुलडाणा शहर आणि बुलडाणा मतदारसंघात कोट्यवधी रुपये किमतीची विकास कामे केली आहे. यामुळे बुलडाणा शहर आणि मतदारसंघाचा कायापालट होत आहे. विकास कामे करताना आमदार गायकवाड यांनी, जाती,धर्मभेद केला नसून मुस्लिम बहुल प्रभागातही मोठ्या संख्येने विकास कामे केली आहे. यामुळे प्रभावित झाल्याने आपण सहकाऱ्यासह शिवसेनेत प्रवेश केल्याचे शाकिर रजा यांनी सांगितले.