आमदार संजय गायकवाड म्हणाले,,आपल्या सगळ्या शत्रूंचा सत्यानाश व्हावा,, अन् एकच हसू उडाला
बुलडाणा – 21 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा शहरातील राजे संभाजीनगर नगर येथील पूज्य गंगामाई स्थापित तेलंगी समाज ट्रस्ट बुलडाणा द्वारा संचालित श्री. दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आज 21 जुलै रोजी दुपारी आ.संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार गायकवाड म्हणाली की, शहरात भरपूर विकास कामे सुरू आहे, दत्त मंदिरासाठी देखील पुढच्या कार्यक्रमात सभा मंडपाचे काम पूर्णत्वास जाईल.माझा दाता (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) भयानक आहे, मी एकनाथ शिंदे साहेबांना जे मागितलं ते मला देतात,शिवाजी महाराजांचा राज्यातील पहिला मंदिर मी बांधला असे ही ते म्हणाले. भाषणाच्या शेवटी प्रार्थना करतांना ते म्हणाले की, गुरु पौर्णिमेनिमित्त दत्ताच्या कृपेने आपलं सर्वांचं आयुष्य चांगलं जावा आणि आपल्या सगळ्या शत्रूंचा सत्यानाश व्हावा, असे म्हणताच उपस्थितांना एकाच हसू आला.या कार्यक्रमाला आ. संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,न.प .माजी उपाध्यक्ष विजय जायभाय,गोविंदा खुमकर,माजी नगरसेवक शामराव घटटे,पत्रकार अजय बिल्लारी उपस्थित होते. महाप्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.