“ड्रंक अँड हिट”,,,खुशाल दारू पिऊन वाहन चालवा,,आपलं कोणीही काही वाकडं करणार नाही?? मद्यधुंद बोलेरो चालकाने दुचाकीला दिली जोरदार धडक,1 जण गंभीर जखमी

More articles

“ड्रंक अँड हिट”,,,खुशाल दारू पिऊन वाहन चालवा,,आपलं कोणीही काही वाकडं करणार नाही?? मद्यधुंद बोलेरो चालकाने दुचाकीला दिली जोरदार धडक,1 जण गंभीर जखमी

बुलडाणा – 21 जुलै, मिरर न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या हिट अँड रन, ड्रंक अँड हिट या अपघाताचे मुद्दे गाजत असतानाच बुलडाणा शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे. एका बोलेरोच्या मद्यधुंद चालकाने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना आज 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील चिखली रोडवर घडली आहे. नियम धाब्यावर बसवून दारू पिऊन वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालायचं आणि जखमी व्यक्ती सोबत सेटलमेंट करून घायचं,, या घटनेत देखील असाच प्रकार काही होत असल्याची चर्चा आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बोलेरो चालक जयसिंग नाईक हा मद्यधुंद अवस्थेत आपले बोलेरो वाहन चालवून त्रिशरण चौकाकडे जात असताना त्याने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली.यामध्ये दुचाकी चालक विलास तुळशीराम सोनुने वय 45 वर्ष रा. शरद कला महाविद्यालय जवळ बुलडाणा हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. आता या “ड्रंक अँड हिट” प्रकरणी पोलीस काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

याच बोलेरोच्या मद्यधुंद चालकाने दुचाकीला धडक दिली होती.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

अनाधिकृत स्कूल व्हॅनच्या धडकेत दुसऱ्या तरुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यू,दारुड्या चालकाच्या हलगर्जीपणा व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे 2 मित्रांनी गमावला जीव बुलडाणा - 25 फेब्रुवारी, मिरर न्युज नेटवर्क शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना अनधिकृतरित्य आपल्या...
spot_img
error: Content is protected !!