BREAKING!!”डेंग्यू”मुळे मृत्यू???संतप्त नातेवाईकांनी प्रेत आणला ग्रामपंचायत समोर, महिलांचा ठिय्या आंदोलन आणि नागरिकांचा आक्रोश

More articles

“डेंग्यू”मुळे मृत्यू???संतप्त नातेवाईकांनी प्रेत आणला ग्रामपंचायत समोर, महिलांचा ठिय्या आंदोलन आणि नागरिकांचा आक्रोश

बुलडाणा – 20 जुलै, मिरर न्युज नेटवर्क

बुलडाणा तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतच्या गलथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. ज्यामध्ये डासाची उत्पत्ती होऊन,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशातच गावातील 48 वर्षीय गजानन करडेल या व्यक्तीला डेंग्यूचे निदान झाल्यानंतर प्रथम बुलडाणा व नंतर छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले,उपचार सुरू असताना आज 20 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध करत मृतदेह हा छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 4 वाजेच्या सुमारास सरळ ग्रामपंचायत समोर आणल्याने एकच खळबळ उडाली.

रायपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ॲम्बुलन्स मध्ये आणलेला मृतदेह

तात्काळ ग्रामपंचायतने गावात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य वाचवावे अशी मागणी लावून धरली. नातेवाईक व गावकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आपल्या पथकासह ग्रामपंचायत गाठून संतप्त झालेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ग्रामपंचायत कडून आश्वासन मिळाल्यानंतर प्रेतावर अंतिम संस्कार करण्यात आले.

संतप्त नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करताना ठाणेदार दुर्गेश राजपूत

मात्र अंतिम संस्कार केल्यानंतर संतप्त गावकरी ग्रामपंचायत समोर पोहोचले व त्यांनी ग्रामपंचायतचा घेराव घालत बैठा आंदोलन सुरू केला.यावेळी ग्रामसेवक गणेश पायघन ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

मित्रा सोबत सहलीला जाने पडले महाग,स्कूल बसला कारने दिलेल्या धडकेत तरुण ठार,मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना बुलडाणा - 23 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात...
spot_img
error: Content is protected !!