हे चाललंय तरी काय???कृषी विभाग लक्ष देणार का??पुन्हा 4 शेतमजुरांना “फ्युरी”ची विषबाधा,जिल्हा रुग्णालयात दाखल
बुलडाणा – 19 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा जिल्ह्याच्या धामणगाव बढे येथे एका शेतात मका पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या “फ्यूरी” नामक कीटकनाशका पासून 4 जणांना विषबाधा झाल्याची घटना काल 18 जुलै रोजी घडली असून यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता,तर 3 जणांची प्रकृती अत्यावस्थ होती.ही घटना ताजी असतांनाच आज 19 जुलै रोजी पुन्हा त्याच परिसरातील सिंदखेड लपाली येथील 4 शेतमजूर महिलांना “फ्युरी” ची विषबाधा झाली आहे.त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले आहे.
मकाच्या कंसाला कीड लागू नये म्हणून शेतकरी त्यात “फ्युरी” नामक किटनाशक औषधी टाकतात. काल गुरुवारी धामणगाव बढे येथील शेतकरी दामोदर नारायण जाधव हे आपल्या परिवारातील सदस्यासह शेतात मकावर फ्युरी टाकण्यासाठी गेले असता त्यांना विषबाधा झाली. तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.तर त्यांच्या परिवारातील इतर 3 जणांवर उपचार सुरू होते.आज शुक्रवारी पुन्हा तसीच घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील सिंदखेड पाली या गावातील दिलीप मधुकर गडाख यांनी ठोक्याने शेत घेऊन त्यात मका पेरलेली आहे. आज त्यांच्या शेतात महिला मजुर मकावर फ्युरी टाकत असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास या महिला मजुरांना मळमळ होऊन उलट्या झाले. तात्काळ त्यांना धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. यात स्वाती गजानन गडाख वय 33 वर्ष, आरती लहू मेंगे वय 18 वर्ष, सुमनबाई प्रभाकर कऱ्हाडे वय 65 वर्ष आणि अनिता अंकुश मेंगे वय 45 वर्षे सर्व रा.सिंदखेड लापाली या महिला मजुरांचा समावेश आहे. “फ्युरी’ हे किटनाशक मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असून याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.