बुलडाणा-मलकापूर महामार्गावरील राजुर घाटात वळण रस्ता व बुलडाणा रिंग रोडचा प्रश्न लागणार मार्गी,आ.गायकवाड यांनी घेतला आढावा
बुलडाणा – मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचे असलेले राजुर घाट वळण रस्ता व बुलडाणा रिंग रोड या दोन प्रश्नाला मार्गी लावण्याच्या कामाला वेग आला आहे. यासंदर्भात नुकतेच बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्या सोबत आढावा बैठक घेतली व विविध सूचना दिल्या. सदर बैठक ही आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.
बुलडाणा ते मलकापूर मार्गावर असलेला राजुर घाटातील रस्ता हा लहान असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ व ट्रॅफिक असते परिणामी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. सदर वळण रस्ता हा जाण्यासाठी व परत येण्यासाठी दुसरा मार्ग तयार करण्यात यावा या संदर्भात बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्याने या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुपालन होऊन संबंधित अधिकाऱ्यांना बैठका घेण्याच्या आदेश दिले होते. पश्चात आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत या विषयाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याची विशेष बैठक मातोश्री संपर्क कार्यालय येथे नुकतेच पार पडली. यावेळी यामध्ये सदर मार्गासाठी अंतिम सर्वेक्षण इस्टिमेट करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
बुलडाणा शहराला लागून असलेला रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यावर शहरातून होणारी वरदळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुभाष राऊत, उपविभागीय अभियंता राजेश एकडे आदी मान्यवर उपस्थित होते.