कॅमेऱ्यावर मारला काळा “स्प्रे” तरीही,,,, “या” 2 गावात एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, 2 चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा – 17 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्याचे अनेक घटना जिल्ह्यात घडलेले आहे. एटीएम फोडणाऱ्यांचा उद्देश साध्य होऊ नये म्हणून एटीएमचा सिस्टम अपडेट करण्यात आला आहे आणि याच सिस्टम मुळे बुलडाणा जिल्ह्यातील 2 ठिकाणी काल रात्री 2 चोरट्यांचा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न असफल झाला आहे.
बुलडाणा – मलकापूर महामार्गावरील दाताळा येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न रात्री 4 वाजेच्या सुमारास झाला.या ठिकाणी चोरटे एटीएम मध्ये शिरले व त्यांनी आतील सिव्हिटीव्ही व मशीनवर असलेल्या कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला.नंतर त्यांनी कटरने मशीनला कापण्याचा प्रयत्न करताच “एसओएस” प्रणाली द्वारे संबंधित कंपनीला “मॅसेज” गेला आणि यंत्रणा अलर्ट मोडवर आली. ही गोष्ट चोरट्यांच्या लक्षात येतच त्यांनी तिथून पळ काढला. ते बुलडाण्याच्या दिशेने निघाले व रस्त्यात शेलापुर येथील एटीएम सुद्धा त्यांनी याच पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी देखील त्यांच्या हाती निराशाच आली. घटनेची माहिती मिळताच दाताळा येथे मलकापूर ग्रामीण व शेलापूर येथे बोराखेडी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण व बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात 2 चोरट्याविरुद्ध एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.