बुलडाणा जिल्ह्यातील “या” 6 विधानसभा मतदारसंघात एमआयएम उडवणार “पतंग”???? खा.असद ओवैसी यांनी घेतलं आढावा
बुलडाणा – 14 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहे. शनिवारी औरंगाबाद येथे एमआयएम पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक खा. असदुद्दीन ओवेसी, प्रदेशाध्यक्ष व माजी खा. इम्तियाज जलील व पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत एमआयएमचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख व डॉ.मोबीन खान हे देखील उपस्थित होते.यावेळी पक्ष श्रेष्ठींनी बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेतला व कोणकोणत्या मतदारसंघात पक्षाची काय परिस्थिती आहे? कुठे-कुठे आपण उमेदवार देऊ शकतात?? अशी विचारणा दोन्ही जिल्हाध्यक्षांना झाल्यानंतर त्यांनी बुलडाणा,मेहकर, चिखली,मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव या 6 मतदार संघात उमेदवारी दिल्या जाऊ शकतात,अशी माहिती वरिष्ठांना दिली आहे.आता यावर वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. मोबिन खान व दानिश शेख यांनी बुलडाणा मिररशी बोलतांना दिली आहे.