अर्ध्या रात्री चालले चोर-पोलीसांचे खेळ,,,एसडीपीओ सुधीर पाटील यांनी पाठलाग करुण गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडले
बुलडाणा – 10 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा शहरातुन गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह पथकाने पाठलाग करुन 3 गाई व झायलो वाहन जप्त केले आहेत. ही कारवाई दि.10 जुलैच्या पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास त्रिशरण चौकात पकडले आहे.आपल्या मागावर पोलीस असल्याचे लक्षात येताच गो-तस्कर आपले वाहन थांबवून त्रिशरण चौकात अंधाराचा फायदा घेवुन पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एमएच-05 एएक्स-1213 या क्रमांकाच्या चारचाकी झायलो वाहनात गोवंश जनावरे कोंबून गो- तस्कर बुलडाणा शहरातील कारंजा चौकातून रात्री गस्तीवर असलेले एसडीपीओ सुधीर पाटील व त्यांच्या पथकाच्या लक्षात आल्याने त्यांनी झायलो वाहनाचा पाठलाग सुरु केला. सदर वाहन एडेड चौक मार्गे चिखलीच्या दिशेने वेगाने धावत होते. पोलीसांनीही पाठलाग सुरु ठेवला. शेवटी झायलो वाहन सोडून त्यातील 3 ते 4 लोक त्रिशरण चौकातून पळून गेले. पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात 3 गाई निर्दयीपणे कोंबुन नेल्या जात होते. ही गायी चोरून नेल्या जात असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.विशेष बाब म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील स्वत: या कारवाईत सहभागी होते. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकासह 3 व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये एसडीपीओ पथकातील एएसआय सुधाकर तारकसे, सतीष राठोड, संदिप मोधे, राजु जाधव सहभागी होते. पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहेत.