बुलडाणा जिल्ह्यातील 14 महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद,मंडळांची यादी बातमी मध्ये पहा,,,

More articles

बुलडाणा जिल्ह्यातील 14 महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद,मंडळांची यादी बातमी मध्ये पहा,,,

बुलडाणा – 8 जुलै, मिरर न्यूज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल पासून पाऊस सुरु होता. रात्रीच्या दरम्यान काही तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने आज 8 जुलैच्या सकाळ पासून अनेक ठिकाणी पुरपरिस्थिति निर्माण झाली होती. विशेषता खामगाव,शेगांव तालुक्याला जोरदार पावसाने झोडपुन काढले आहे.नदी-नाले पात्र सोडून वाहत असल्याने शेतात व काही गावात पुराचे पाणी शिरले. पिकां सहित हजारो एकर शेती वाहून गेली आहे. एकट्या खामगांव तालुक्यातील एकूण 12 महसूली मंडळापैकी 8 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे.त्यात आवार मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. मोताळा तालुक्यातील 5 तर मेहकर तालुक्यातील एका मंडळाचा यात समावेश आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खालील महसूली मंडळात अतिवृष्टिची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय पाऊस मिलीमीटर मध्ये,,,,

खामगाव तालुका :-
1) खामगाव 65.8
2) लाखनवाडा 68.8
3) हिवरखेड 126.5
4) काळेगाव 104.5
5) आवार 219.3
6) अटाळी 68.8
7) पळशी 93.3
8) जनुना 119.5

मोताळा तालुका :-
9) मोताळा 72.5
10) बोराखेडी 168.3
11) धामणगाव 74.3
12) पिंपरी 78.8
13) पिंपळगाव 74

मेहकर तालुका :-
14) कल्याणा 83.3

ही माहिती बुलडाणा आपत्ति व्यवस्थापन कक्षाने आज 8 जुलैला सायंकाळी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

"त्या" मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना बुलडाणा - 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे...
spot_img
error: Content is protected !!