चित्तथरारक घटना!!!धावत्या कारचा मागील काच फोडून लोखंडी पाईप शिरले आत,,,बुलडाण्यात मोठा अनर्थ टळला,,,
बुलडाणा – 6 जुलै, मिरर न्युज नेटवर्क
रस्त्याने जात असतांना अचानक ऑटो रिक्षा चालकाने ब्रेक मारले म्हणून मागील कार चालकाने ही ब्रेक दाबले आणि या कारच्या मागे असलेल्या बोलेरो पिकअप वाहन चालकाने देखील ब्रेक दाबले.भरधाव वेगात असलेल्या पिकअपला अचानक ब्रेक लागताच त्याच्या वरती ठेवलेले लोखंडी पाईप जोरात पुढे सरकले आणि समोरच्या कारवर पडले आणि यातील काही पाईप कारचा मागील काचं फोडून कारच्या आत शिरले,इतकं तरी बरं झालं की कारच्या मागच्या सिटवर कोणी नव्होता म्हणून मोठी दुर्घटना टळली. हा विचित्र अपघात बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील देवीच्या मंदिरासमोर आज 6 जुलैला दुपारी घडला. अपघाता नंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली.बुलडाणा कृषी विभागात कार्यरत गजानन सांगळे यांची कारचे नुकसान झाले असून बोलेरो वाहन बुलढाणा येथील हार्डवेअर मालक बाफना यांची असल्याची माहिती समोर आली आहे.