घाटनांद्रा येथील “शिवा महाराज” फक्त पुरुषांनाच नव्हे तर महिलांना देखील करतो मारहाण,,महिलेला मारहाणीचा नवीन व्हिडिओ झालं व्हायरल
बुलडाणा – 30 जून, मिरर न्यूज नेटवर्क
दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला महाराजाकडून बेदम मारहाण करण्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता.या प्रकरणी मार खाणारा व्यक्ती राजेश राठोड रा.माळेगाव ता.मंठा जि. जालना याने रायपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज रा. घाटनांद्रा ता.जि.बुलडाणा याच्या विरुद्ध काल 29 जूनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.महाराजाचा हा प्रकरण गाजत असतांनाच आज 30 जुनला दुपारी 1 वाजेच्या सुमारास महाराजांचा एक नवीन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.विशेष बाब म्हणजे या व्हीडिओ मध्ये शिवा महाराज एका महिलेला मारहाण करतांना दिसत आहे.या व्हीडिओच्या संभाषणा वरून हे सिद्ध होत आहे की महाराज त्या महिलेच्या अंगातील भूतबाधा उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळे महाराजाकडून जादू टोना विरोधी कायद्याचा भंग झाला आहे.मार खाणारी महिला कोण व कुठली आहे?हे अद्याप तरी समोर आलेले नाही.आता महाराजावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते??यावर जनतेचे लक्ष लागून आहे.
“अंनिस” म्हणते महाराजावर गुन्हा दाखल करुण त्याला अटक करा
महाराजावर कार्रवाई करू!!!एसपी सुनील कडासने
भूतबाधा उतरवण्याचा उपचार करीत असल्याचा एक व्हिडिओ बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील शिवा महाराज यांचा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सदर व्हिडिओ “बुलडाणा MIRROR” ने जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना दाखवले असता याप्रकरणी सुद्धा शिवा महाराजावर रायपूर पोलीस ठाण्यात कारवाई करू,अशी माहिती एसपी सुनील कडासने यांनी दिली आहे.