दारू सोडवण्यासाठी आलेल्या भक्ताला मारहाण केल्याप्रकरणी शिवा महाराज विरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा – 29 जून, मिरर न्युज नेटवर्क
दारूचा व्यसन सोडवण्यासाठी अनेक उपचार केले जातात, परंतु बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा जवळ एका आश्रमात सुरू असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या भक्ताला मारहाण केली जात असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समोर आला आहे. याप्रकरणी मार खाणाऱ्या व्यक्तीने रायपुर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने व्यसनमुक्ती केंद्र चालवणाऱ्या शिवा महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 जून रोजी सोशल मिडीयावर घाटनांद्रा येथील महाराज हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झालेला होता. सदर व्हिडिओची गंभीर दखल घेत बुलड पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल संपूर्ण माहिती घेणेबाबत रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार रायपुर ठाणेदार राजपूत यांनी प्रकरणाची तात्काळ माहिती घेवुन व्हीडिओ मध्ये मार खाणाऱ्या पिडीत व्यक्तीचा शोध घेतला व त्यानुसार सदर व्यक्ती नामे राजेश श्रीराम राठोड वय 36 वर्ष रा.माळेगांव, ता.मंठा.जि जालना हा आज 29 जून रोजी रायपूर पोलीस स्टेशनला आला व त्याने घडलेल्या प्रकरणाबाबत दिलेल्या तक्रारीनुसार बुलडाणा तालुक्यातील ग्राम घाटनांद्रा शिवारात राहत असलेल्या शिवाजी पुंडलिक बरडे उर्फ शिवा महाराज याचे विरूध्द तक्रार दिल्याने शिवा महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी बुलड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली ठाणेदार दुर्गेश राजपूत हे सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.तसेच रायपूर पोलीस स्टेशन हददीत अश्याप्रकारे इतर ठिकाणी काही प्रकरण घडले असतील किंवा होत असेल तर निसंकोचपणे पोलीस स्टेशन रायपुर यांना कळवावे जेणेकरून संबधीता विरूध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल,असे आवाहन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी केले आहे.