बुलडाणा शहरात चोरांची हिम्मत इतकी कशी वाढली??पोलीस मुख्यालय नंतर आता जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बंगल्याला केले टारगेट
बुलडाणा – 17 जून, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा शहरात मागील काही काळापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.चोर इतकी बेभान झालेले आहे की त्यांच्या मनात पोलिसांचा थोडाही धाक दिसून येत नाही.मागील 6 मेला विष्णूवाडी येथील शासकीय बंगल्यात राहणारे मा. न्यायाधीश ए.एम.मगरे यांच्या बंगल्यातून तस्करांनी चंदनाचा झाडच कापून नेला होता. तर 3 दिवस आगोदर जिल्हा पोलीस मुख्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन वसाहतीच्या इमारतीतून 2 लाख 91 हजार रुपयांचा साहित्य चोरण्यात आला. आता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खटटी यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न असफल झालेला आहे.
या बाबत हकिकत अशा प्रकारे आहे की फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज रमेश गायकवाड यांनी 16 जूनला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,त्यांची दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.खटटी साहेब यांच्या निवासस्थानी ड्यूटी सुरु असतांना कोर्टाचे शिपाई शेळके यांनी आवाज दिला असता ते त्यांच्याकडे गेले तेव्हा शिपाई शेळके याने सांगीतले की 2 महीला निवासस्थानाच्या भिंतीवरुन आतमध्ये आल्या आहे.तेथे गेलो व त्या महीलांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यांना निवासस्थान परीसरात येण्याचे कारण विचारले असता त्याबाबत सुध्दा समाधानकारक उत्तर दिले नाही.दोन्ही महीला स्टोअर रुम मध्ये काहीतरी चोरी करण्याच्या उददेशाने आल्या होत्या.अश्या तक्रारीवर आरोपी आशा दिलीप लावाडकर वय 40 वर्षे आणि अरुणा रमेश लावाडकर वय 45 वर्षे दोन्ही रा.माहोरा ता. जाफ्राबाद,जि.जालना यांच्याविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.