जांभूळ तोडण्यासाठी “तो” झाडावर चढला,,अन् 14 वर्षीय मुला सोबत दुर्दैवी घडलं….
बुलडाणा – 13 जून, मिरर न्युज नेटवर्क
जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेला 14 वर्षीय मुलगा खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना काल 12 जूनला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बुलडाणा तालुक्यातील कोलवड शिवारात घडली आहे.
शुभम गजानन गवई असे मृतक बालकाचे नाव आहे. कोलवड गावाला लागून असलेल्या एका शेतातील जांभळाच्या झाडावर चढून जांभूळ तोडण्याचा प्रयत्न करत असताना झाडाची फांदी तूटल्यामुळे शुभम खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.